गृहनिर्माण संस्थांवर प्रशासकांच्या पॅनेलसाठी 1 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 



धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार गृहनिर्माण संस्थांवर नियुक्त करण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्यांचे (प्रशासक) पॅनेल तयार करण्यासाठी राज्य शासनाचे गटप्रवर्गातील निवृत्त अधिकारी कर्मचारी, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि शासकीय सहकार लेखा पदविका (जी. डी. सी. ॲण्ड .), उच्चतम सहकार पदविकाधारक (एच. डी. सी.) चार्टर्ड अकाऊंटट (सी. .), इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट ॲण्ड वर्कस अकाऊंटट (आय. सी. डब्ल्यू. .), कंपनी सेक्रेटरी (सी. एस.), सहकार विभागातील प्रशासन, लेखा परीक्षण विभागातील निवृत्त अधिकारी कर्मचारी, नागरी कर्मचारी सहकारी बँकांचे व्यवस्थापक, कायद्याची पदवीधारक यांनी अर्ज सादर करावेत.

अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांचे कार्यालय (तिसरा मजला, गृहनिर्माण भवन, राम गणेश गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे (प्रशासकीय संकुल, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे) यांच्याकडे 4 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील, असे विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती लाठकर, जिल्हा उपनिबंधक अभिजित देशपांडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने