भारत बंदला बिरसा फायटर्सचा जाहीर पाठींबा



रत्नागिरी: केंद्र सरकारच्या महागाई, अन्यायकारक कृषी कायदेे, बेरोजगारी,  सरकारी संपत्तिचे खासगीकरण यांसारख्या गंभीर धोरणाविरोधात देशभरातील विविध राजकिय पार्ट्या, विविध संघटनांनी 27 सप्टेंबर 2021 रोजी पुकारलेल्या भारत बंद ला 'बिरसा फायटर्स'चा देशभरातून  जाहीर पाठिंबा राहील, असे बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय  अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी जाहीर केले आहे. 
             भारत बंदला सर्व प्रथम बिरसा फायटर्स  धुळे जिल्हा यांनी पाठींबा जाहीर केला होता. त्यानंतर वाॅटसप ग्रूपवर बिरसा फायटर्स चे राज्याध्यक्ष मनोज पावरा यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून भारत बंद ला पाठिंबा देऊयात,असे मत व्यक्त केले. त्यानंतर राज्यातील सर्व पदाधिकारी यांनी आपसात चर्चा करून संपूर्ण महाराष्ट्राभर पाठिंबा जाहीर करण्यासाठी सहमती ठरली.
              बिरसा फायटर्स ही राष्ट्रीय संघटना आहे. भारत बंद चे विषय हे सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत. म्हणून संपूर्ण भारतभरच बिरसा फायटर्स तर्फे पाठिंबा जाहीर करीत आहोत. असे सुशीलकुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी पोस्ट द्वारे जाहीर केले. दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी भारत सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून बॅनर व घोषणा बाजी द्वारे बिरसा फायटर्स संघटना भारत बंदला सक्रिय पाठिंबा देईल, अशी माहिती सुशीलकुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स  यांनी दिली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने