शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे ग्रामस्थांतर्फे यावर्षी श्रीमद् भागवत कथेची येथील समाज मंदिरात आयोजन करण्यात आले होते भागवत ग्रंथाचे यजमान दयाराम काशिराम माळी होते तर विखरण येथील द्वारका दिश संस्थांचे ह-भ-प भागवताचार्यअशोक महाराज यांच्या सुवाच्च वाणीतून सात दिवस श्रोत्यांनी भागवत ग्रंथाचे निरूपण केले दुपारी 2 ते 5 या वेळेत भागवत ग्रंथात महाराजांनी अतिशय उत्तम रीतीने ज्ञान अमृत सांगितले तसेच गावात भागवत ग्रंथाची मिरवणूक भजनी मंडळाच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली सकाळी आठ ते 10 ह भ प मच्छिंद्र महाराज कटरे यांचा काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भडणे ग्रामस्थ भजनी मंडळ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला
Tags
news
