महाराष्ट्र राज्य किसान सभेचे उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिले निवेदन




शिरपूर - महाराष्ट्र राज्य किसान सभा ए .आय. के. एस. या संघटनेमार्फत आज शिरपूर तालुक्यात आंदोलन करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी शिरपूर यांना निवेदन देण्यात आले आहे .
यात पूर्वहंगामी कापसाचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाबत प्रामुख्याने मागणी करण्यात आली आहे यात पूर्व हंगामी कापसाच्या अतिवृष्टीमुळे फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांकडे आलेला कापूस व्यापारी कवडीमोल भावाने विकत घेतात, खरीप हंगामात विमा काढलेला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे कामी विमा कंपनी व महसूल विभागाचे तलाठी व मंडळ अधिकारी दुर्लक्ष करीत असून प्रत्यक्षात शिरपूर तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील परवडत नाही. कापूस पिकावर आलेल्या लाल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला असून कापूस हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेलेला आहे आधीच अडचणीत असलेल्या शेतकरी अधिक अडचणीत सापडला आहे आणि म्हणून शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिरपूर तालुक्यात सरसकट नुकसान भरपाई देण्याची जाहीर करावे व इतर मागण्यांसाठी सदरचे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे एडवोकेट हिरालाल परदेशी, एडवोकेट संतोष पाटील, एडवोकेट मदन परदेशी ,  अर्जुन कोळी, किशोर सूर्यवंशी ,रामचंद्र पावरा ,शिवाजीराव पाटील, प्रमोद पाटील ,जितेंद्र देवरे, संजय बाशिंगे, सारिका सोनार ,दशरथ भिल इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने