विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या ४४ वा वर्धापन दिनानिमित्त दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप दोडाईचा (अख्तर शाह)




दोडाईचा (अख्तर शाह)

दोडाईचा विभागातील पदाधिकारी व सभासद वर्ग यांनी सामाजिक बादील जपत दि०३/०९/२०२१  शुक्रवार रोजी उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ऍडमिट रूग्णांना फळ व बिस्किट वाटप करून सामाजिक कार्य केले. युनियन मार्फत नेहमी सामाजिक कार्य होत असते मागील वर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले व यावर्षीही भव्य रक्तदान शिबीर शिरपूर या ठिकाणी दि.०४/०९/२०२१रोजी आयोजित करण्यात आले आहे.

 तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी दोंडाईच्या विभाग कार्यालय गेट जवळ ४४ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधत युनियन चे फलक अनावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाप्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. वाघ साहेब व प्रमुख मान्यवर म्हणुन श्री नाना साहेब थोरात गिरासे साहेब गायकवाड साहेब
युनीयनचे पदाधिकारी- एम एन खाटीक, नरेंद्र सुरेशसिंग गिरासे, संजय चव्हाण, सय्यद नईम, ज्ञानेश्वर गिरासे, दिलीप बिरारी, आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण अहिरे यांनी केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने