नगरसेवक नरेंद्र कोळींनी वाढदिवस न साजरा करता जनसेवा रोटी बँकच्या माध्यमातून पाच गरजूंना वर्षभर देणार जेवण वाढदिवसाचे अवचित साधून केली सुरुवात दोडाईचा (अख्तर शाह)




दोडाईचा (अख्तर शाह)

दोंडाईचा- अनेकांचा वाढदिवस म्हटला तर मोठा गाजावाजा करुन साजरा करत असतात. यात अमाप खर्च देखील होत असतो. मात्र दोंडाईचा येथील मा. शिक्षण सभापती नगरसेवक नरेंद्र कोळी यांनी आगळीवेगळी संकल्पना आखली आहे. ते जनसेवा रोटी बॅंकच्या माध्यमातून वर्षभर पाच निराधार गरजूंना जेवनाचा टीपीन देणार आहे. 
आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या संकल्पनेला त्यांनी सुरुवात केली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपनगराध्यक्ष रवी उपाध्ये  
यांच्या हस्ते निराधार गरजूंना जेवणाचा टिफिन देण्यात आला.  या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक राजेश जाधव, हितेंद्र महाले, विजय मराठे, रवी जाधव, प्रमोद चौधरी, रवी पाटील अविनाश ठाकूर, इमरान खाटीक, पंकज चौधरी रोशन कोळी, बापू कोळी, आदी उपस्थित होते. तसेच जनसेवा रोटी बँक च्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे की, अशा कार्यक्रमांना  इतर खर्च न करता अशा निराधारांना एक वेळचं आपल्या इच्छा शक्तीप्रमाणे समाजाचे काही देणे लागते या नात्याने उदात्त हेतूने मदतीसाठी पुढे यावे असे आव्हान करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने