मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न लातूर प्रतिनिधी- राहुल शिवणे कुमठा




 लातूर प्रतिनिधी- राहुल शिवणे कुमठा 

आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना लातूर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले परंतु काही ठराविक राज्यांना त्यानंतरही स्वातंत्र्य मिळाले नव्हते, तत्कालीन हैदराबाद संस्थान मध्ये असलेल्या मराठवाडा 17 सप्टेंबर  रोजी स्वतंत्र झाला,  मराठवाड्यामधील अनेक ज्ञात-अज्ञात  
हुतात्माना याप्रसंगी नमन करून आपणा सर्वाना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देत आहे असे यावेळी श्री राहुल केंद्रे यांनी  सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष भारतबाई साळुंके मॅडम, कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंदराव चिलकुरे , समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, महिला व बाल कल्याण सभापती ज्योतीताई राठोड, डॉ. संतोष वाघमारे, सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने