मोनिकाताई शिंपी ह्या धुळे शहरात निवासी असून अनेक संस्थांचे ते पदाधिकारी आहेत.घर परीवार सांभाळत समाज सेवेची त्यांना सुरुवातीपासूनच आवड होती. गेल्या वीस वर्षांपासून ते समाज सेवेचे काम अतिशय निस्वार्थ भावनेने करत आहेत. कोरोना काळात तर त्यांनी स्वतःला खूप वाहून घेतले.स्वखर्चाने मास्क, सॅनिटाईझर कपडे,गरीबांना भोजन ही कामे केलेली आहेत.फराळ वाटप,रोख रक्कम, रक्तदान शिबीर आयोजित केली आहेत. मुक्ता आदिवासीं बहुउद्देशीय संस्थेमार्फत त्यांनी समाज उपयोगी अनेक उपक्रम राबविले आहेत .त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल राज्यपालाकडून पण घेण्यात आली त्यांना राज्यपालांनी सन्मानित पण केले आहे. त्याच्या ह्या कार्यामुळे त्यांची मुलाखत आकाशवाणी धुळे केंद्रावर पण येवून गेली आहे.आता पर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. समाज सेवा ही त्यांच्या नसानसात भिनलेली असल्यामुळे शेवटचा श्वासापर्यंत समाज सेवा करण्याचा त्यांच्या मानस आहे.असे त्यागी,दुसर्यासाठी झिजणारे लोक जो पर्यंत समाजात आहेत तोपर्यंत माणूसकी जीवंत आहे.असेच त्यांच्या हातून समाज कार्य घडत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना मोनिकाताईंचा आमच्या वृत्तपत्र समुहाच्या वतीने मानाचा मुजरा
Tags
news
