रत्नागिरी:मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव श्रीम हेमलता ठाकरे ह्या आदिवासी महिलेला अपमानास्पद वागणूक देऊन मानसिक व शारीरिक त्रास देणा-या दोषींना सेवेतून बडतर्फ करा,अशी मागणी सुशीलकुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ,कुलगुरू मराठवाडा विद्यापीठ यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन मनोज पावरा राज्याध्यक्ष महाराष्ट्र ,राजेश धुर्वे उपाध्यक्ष,राजेंद्र पाडवी महासचिव,दादाजी बागूल कोषाध्यक्ष,केशव पवार महानिरीक्षक,रोहित पावरा राज्य प्रवक्ता,नंदलाल पाडवी कार्याध्यक्ष,विलास पावरा नाशिक विभाग अध्यक्ष,राजाभाऊ सरनोबत कोकण विभाग अध्यक्ष,सुरेश कुमार पंधरे विदर्भ प्रमुख आणि अध्यक्ष,अॅड.जगदीश पावरा पुणे विभाग प्रमुख आणि अध्यक्ष,कृष्णा भंडारी जिल्हाध्यक्ष पुणे,वसंत पावरा जिल्हाध्यक्ष धुळे,सतिश जाधव ठाणे जिल्हाध्यक्ष,साहेब राव कोकणी जिल्हाध्यक्ष नंदुरबार,गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नंदुरबार,आकाश पवार तालुका अध्यक्ष बागलाण,शरद जाधव तालुका अध्यक्ष मालेगाव,विजय सहारे महासचिव नाशिक,हिरालाल गायकवाड उपाध्यक्ष नाशिक,सुभाष पावरा तालुका अध्यक्ष तळोदा,संपत वसावे तालुका अध्यक्ष अक्कलकुवा,संतोष वळवी तालुका अध्यक्ष शहादा इत्यादी बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी राज्यपाल व संबंधित मंत्री यांच्या कडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील श्रीमती हेमलता ठाकरे ह्या आदिवासी महिलेवर विद्यापिठातील संबंधित अधिकारी अपमानास्पद वागणूक देऊन मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याची घटना सोशल मिडियावर वायरल होत आहे. मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिव म्हणून कार्यरत असणा-या श्रीमती हेमलता ठाकरे ह्या आदिवासी महिलेला प्रशासनाने पदभार दिला,परंतु ना पदभार,ना कॅबीन,ना टेबल,ना खुर्ची दिली.गेल्या 1 महिन्यापासून सदर आदिवासी महिलेला आपल्या घरातून शतरंजी आणून फरशीवर टाकून आपले काम करावे लागत आहे.सदर महिला ह्या आदिवासी समाजाच्या असल्यामुळे विद्यापीठातील प्रशासन जाणून पूर्वक हेडसांड करत आहे. एका महिला उपकुलसचिवाला फरशीवर खाली बसून काम करावे लागत आहे,हे स्वतंत्र भारतातील सर्वात मोठी लाजीरवाणी व वेदनादायी घटना आहे.स्वतंत्र भारतातील साविञीबाई फुलेंच्या या भारतात एका उच्च शिक्षित आदिवासी महिला उपकुलसचिवास अशा प्रकारे जाणीवपूर्वक मानसिक व शारीरिक त्रास दिला जात आहे. डाॅ.पायल तडवी ह्या आदिवासी विद्यार्थ्यीनीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या घटनेसारखीच ही घटना दिसत आहे.आपल्या अधिकारापासून वंचित ठेवणा-या व शिक्षणाचे माहेर घर असणा-या व ज्या विद्यापिठाचे नाव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने म्हणजे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे आहे,अशा विद्यापिठाला बदनाम करणा-या,आदिवासी महिला उपकुलसचिवास अपमानास्पद वागणूक देऊन जाणीवपूर्वक मानसिक व शारीरिक छळ करणा-या या घटनेची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून संबंधित दोषींना कायमचेच सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. जेणेकरून मराठवाडा विद्यापीठात पुन्हा अशा लाजीरवाण्या घटना होणार नाहीत. म्हणून मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव श्रीम हेमलता ठाकरे ह्या आदिवासी महिलेला अपमानास्पद वागणूक देऊन मानसिक व शारीरिक त्रास देणा-या संबंधित दोषींना सेवेतून तात्काळ बडतर्फ करावे.हीच नम्र विनंती. अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची नोंद घ्यावी.अशी मागणी सुशीलकुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी मंत्री व मराठा वाडा विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे.
Tags
news
