एस. एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त व्याख्यान संपन्न धुळे

  





शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे भाऊसाहेब ना. स. पाटील साहित्य 
आणि मु. फि. मु. अ. वाणिज्य महाविद्यालय हे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नेहमीच चर्चेत असणारे महाविद्यालय आहे. विद्यार्थ्यांचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक व मानसिक विकास घडवून आणण्यासाठी येथील प्रशासन नेहमीच दक्ष असते. संस्थेचे आधारस्तंभ मा. मंत्री  रोहिदासजी पाटील, संस्थेचे चेअरमन मा. कुणाल पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष मा. भैय्यासाहेब डॉ.संजय पाटील, प्रशासकीय अधिकारी मा. प्रमोद पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर पाटील यांच्या प्रेरणेने महाविद्यालयातील विविध कार्यक्रम आयोजित होत असतात.
          दि.२४ रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर प्रतिमा पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.मनोहर पाटील हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. क.ब.चौ.उ.म.वि.च्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. मोहन पावरा यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. रां. से. यो.एककचे कार्यक्रम अधिकारी प्रा. निलेश पाटील यांनी महाविद्यालयाची गौरवशाली परंपरा आणि एन. एस. एस. मधील उपक्रमांबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. माजी विद्यापिठ समन्वयक प्रा. शशिकांत बोरसे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व यांची सांगड घालत असताना स्वतः च्या गतकाळातील आठवणी सांगितल्या. डॉ.प्रमोद पाटील यांनी एन. एस. एस. च्या दिशादर्शक तत्वावर प्रकाश टाकला. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मनोहर पाटील यांनी विद्यार्थी विकास आणि एन. एस. एस. यांविषयी माहिती दिली.
           डॉ.मनिषा कच्छवे, डॉ.अभयकुमार खैरनार,डॉ. जितेंद्र तलवारे, प्रा.आनंद पवार, डॉ.महेंद्रकुमार वाडे, डॉ. अशपाक शिकलगर, डॉ.सदाशिव सुर्यवंशी, डॉ. भाग्यश्री साळवे, डॉ. दिपक देवरे, डॉ.भैय्या पाटील, प्रा.क्रांती पाटील, डॉ. भाऊसाहेब देसले, डॉ एस.जाधव, प्रा. संदीप देवरे, प्रा. प्रशांत भदाने, डॉ.साळवे, प्रा.अर्चना पाटील या सर्वांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या आयोजनात राष्ट्रीय सेवा योजना एकाकचे कार्यक्रम अधिकारी प्रा.निलेश पाटील, सहा.कार्यक्रम अधिकारी डॉ.शरद भामरे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.कल्पना पाटील यांची भूमिका मोलाची होती. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या हर्षल सैंदाणे, प्रीती चौधरी, संजना कुमावत या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून मोलाची भूमिका पार पाडली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने