दोडाईचा (अख्तर शाह)
निवेदनात म्हटले आहे कि
वंचित बहूजन युवा आघाडी दोंडाईचा. शिंदखेडा तालुका जिल्हा धुळे युवा आघाडीचे वतीने निवेदन देण्यात आले
दोन वर्षांपासून बंद असलेली सैन्य भरती बंद आहे.ही सैन्य भरती तातडीने सुरू करावी अशी आमची मागणी आहे. सैन्य भरती सुरू न केल्यास युवा आघाडी चे प्रदेश अध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा ह्यांचे नेतृत्वाखाली आणि प्रदेश पदाधिकारी ह्यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये संसदेला घेराव घालण्यात येईल.
केंद्र सरकारने गत दोन वर्षांपासून सैन्य भरती बंद केली आहे. सैन्यात दाखल होण्याची ईच्छा असणाऱ्या हजारो तरुणांनी पोलिस सैन्य भरतीची तयारी केली आहे.मात्र तयारी करणारे तरुण हवालदिल आहेत.सबब सैन्य भरती त्वरीत सुरू करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक बनली असून सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी राज्यभर निवेदन देण्यात येत आहेत.तसे आदेश जिल्हा शहर युवा पदाधिकारी ह्यांना प्रदेश युवक अध्यक्ष निलेश विश्वकर्मा ह्यांनी दिले आहेत.केंद्र सरकारने तातडीने सैन्य भरती सुरू करावी अन्यथा संसदेला घेराव घालू असा इशाराही प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा ह्यांनी दिला आहे.
देशातील सैन्य भरती गत दोन वर्षांपासून बंद असल्याने विद्यार्थी एज बार होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने ताबडतोब सैन्य भरती करावी, ह्यासाठी सदर निवेदन आहे.सैन्य भरती तातडीने सूरु व्हावी. तातडीने सैन्य भरती सुरू करण्यात यावी, पाच वर्ष सैन्य भरतीची वयोमर्यादा वाढविण्यात यावी. निमलष्करी दलात एक लाख २७ हजार पदे रिक्त असताना केवळ २५ हजार पदांसाठी शासनाने भरतीची जाहिरात काढली आहे. ती जाहिरात पूर्ण एक लाख २७ हजार पदांसाठी काढण्यात यावी, वर्षाला किमान दोन भरती घ्याव्या.अश्या मागण्या युवा आघाडी करण्यात आले
आहे.तात्काळ सैन्य भरती केली नाही तर, राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहूजन युवा आघाडी मोर्चे काढेल. तरीही सैन्य भरती सुरु न झाल्यास वंचित चे युवा पदाधिकारी आणि विद्यार्थी ह्यांना सोबत घेऊन दिल्लीतील संसदेला घेराव घालण्यात येईल, असा इशारा यावेळी युवा आघाडीचे वतीने दिला जात आहे.
दोन वर्षांपासून बंद असलेली सैन्य भरती बंद आहे.ही सैन्य भरती तातडीने सुरू करावी अशी आमची मागणी .करीता सदर निवेदन
यावेळी उपस्थित
सन्मा.भूपेंद्र मोहिते सर
वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा सदस्य धुळे
सुनील भाऊ पवार
भारतीय बौद्ध महासभा मा. अध्यक्ष
नितीन ठाकूर सर
वंचितचे व सामाजिक कार्यकर्ते ठाकूर समाज दोंडाईचा
प्रकशजी भिडे
वांचितचे व सा.कार्य. मेहतर समाज
पृथ्वीराज पिंपळे
जुबेर शेख
एम.आय .एम प्रमुख दोंडाईचा शहर
लखनभाऊ थोरात .संग्राम मोहिते
विक्की पवार .आकाश इंदवे.
महेंद्र बैसाने.
जितू भालेराव.
सागर आप्पा नगराळे.
शुभम मोहिते.
गौतम अहिरे .बबलू नगराळे
आदी कार्यकर्ते व पदाधिकारी व शहरातील व तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
news
