शिरपूर - विद्युत महावितरण तर्फे शिरपूर शहर व तालुक्यातील गावात सक्तीने व जबरदस्तीने विज बिलांची वसुली होत असून बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यासाठी ग्राहकांना कोणतीही नोटीस दिली जात नाही. तरी महावितरणची अन्यायकारक वसुली थांबविण्यात यावी तसेच मनमानीपणे वागणाऱ्या अधिका-यांची बदली करण्यात यावी. अशी मागणी केली आहे. यासाठी महावितरणच्या कार्यालयासमोर मनविसे तर्फ आंदोलन करून याबाबत निवेदन देण्यात आले. कोरोनाच्या गंभीर अशा परिस्थीतीत सर्वत्र आर्थिक चक्र थांबले असताना विद्युत महावितरण विभागाकडून वीज देयक भरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना मानसिक त्रास देत आहेत. वीज ग्राहकांना कुठलीही नोटीस न बजावता का घरातील कर्त्या पुरुषाला माहिती न देता वीज जोडणी खंडीत करण्यात येत आहे. अनेक वेळा समस्या सांगायला गेल्यावर संबंधित अधिका-याची दादागिरीच्या भाषेत बोलत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी समस्या कोणाकडे मांडावी असा प्रश्न आहे, याबाबत महावितरणतर्फे तोडगा काढावा. अन्यथा मनविसे व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा देखील मनविसे व ग्रामस्थांनी दिला आहे.
सदर निवेदनावर पुनमचंद मोरे, अमित कुरेशी ,राहुल शेवाळे ,अमोल गुजर ,राकेश गुजर किरण भिल,सोनू राजपूत विकी ठाकूर अनिल भिल, ज्ञानेश्वर भिल,शोएब खाटीक इत्यादी ग्रामस्थ व पदाधिकार्यांच्या सह्या आहेत.
Tags
news

