दोंडाईचा प्रतिनिधी - धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संघ दोंडाईचा यांच्यावतीने ज्येष्ठांच्या प्रबोधनासाठी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आलेला असून यासाठी सर्व सभासद बंधूंनी सदर स्नेहमेळावा ला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एस. पी .गिरासे व सचिव सुरेश ढोमन पाटील यांनी केले आहे.
सदर आयोजनात प्रबोधनाच्या मुख्य विषय ज्येष्ठांसाठी मृत्युपत्र किंवा इच्छापत्र असा असून त्यासाठी तज्ञ वक्ते एडवोकेट जतिन जगदीश बाई वाघेला मार्गदर्शन करणार असून मिळण्याचे ठिकाण ताई साहेब जमादार सभागृह सानेगुरुजी कॉलनी दोंडाईचा असे आहे. सदरच्या मेळावा दिनांक 1 ऑक्टोबर 2019 शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता आयोजित केला असून ज्येष्ठ नागरिकांनी व सदस्यांनी याची नोंद घ्यावी व मेळावाच्या लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Tags
news
