धुळे जिल्ह्यातील एस. एस. व्ही. पी. एस. कला आणि वाणिज्य महाविद्यालय, धुळे हे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नेहमीच चर्चेत असणारे महाविद्यालय आहे. विद्यार्थ्यांचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक व मानसिक विकास घडवून आणण्यासाठी येथील प्रशासन नेहमीच दक्ष असते. संस्थेचे आधारस्तंभ मा. मंत्री दाजीसाहेब रोहिदासजी पाटील, संस्थेचे चेअरमन मा. बाबासाहेब कुणालजी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष मा. भैय्यासाहेब डॉ.संजय पाटील, प्रशासकीय अधिकारी मा. प्रमोद पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर पाटील यांच्या प्रेरणेने महाविद्यालयातील विविध कार्यक्रम आयोजित होत असतात.
कारोनाच्या वैश्विक महामारीवर विजय मिळवत असताना महाविद्यालयातील विद्यार्थी आणि पालक यांच्या आरोग्यासाठी सामाजिक हेतू मनात ठेवून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एकाकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली. २३ रोजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थी आणि पालकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोहर पाटील, युवासेनेचे ऍड.पंकज गोरे, डॉ.मोहन पावरा, डॉ. बागल, डॉ. वाडे, डॉ.प्रमोद पाटील, डॉ.सभाजी नरुटे, डॉ. दिपक देवरे, डॉ.अभय खैरनार, डॉ.भैय्या पाटील, प्रा.क्रांती पाटील, प्रा. प्रशांत वानखेडे,प्रा.ठाकरे, प्रा. भदाने, डॉ.साळवे या सर्वांची उपस्थिती होती. लसीकरणासाठी महानगरपालिकेकडून लसीकरण पर्यवेक्षक सौ.रोहिणी जगदेव, आरोग्यसेविका संगीता काकडे, कुंता नवटके, आशा वर्कर ज्योती वानी यांनी लसीकरण मोहमेत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.या कार्यक्रमात एकुण १३२ विद्यार्थी आणि पालकांनी लसीकरण करून या कार्यक्रमात उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला. या कार्यक्रमाच्या आयोजनात राष्ट्रीय सेवा योजना एकाकचे कार्यक्रम अधिकारी प्रा.निलेश पाटील, सहा.कार्यक्रम अधिकारी डॉ.शरद भामरे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.कल्पना पाटील यांची भूमिका मोलाची होती. या मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून मोलाची भूमिका पार पाडली.
Tags
news
