प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे : राज्य सरकारने हुक्का पार्लरवर बंदी घातलेली असताना विमाननगर भागातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला.
या कारवाईत हुक्का पार्लरचा मालक तसेच व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी हॉटेल तलबचे मालक सचिन अशोक रणपिसे (वय ३०), अमर संतोष गायकवाड
(वय २६, दोघे रा. येरवडा),
दिलीपकुमार मांगीलाला मालविया
(वय २६, रा. हडपसर)
यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमाननगर भागातील देवकर चौकात हॉटेल तलबमध्ये बेकायदा हुक्का पार्लरवर चालविले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधाला मिळाली.
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि पथकाने हुक्का पार्लरवर कारवाई केली.
या कारवाईत अकरा हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू, अन्य साहित्य तसेच दुचाकी जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Tags
news
