दोडाईचा (अख्तर शाह)
सदर कार्यक्रमाची सुरुवात शिंदखेडा पियु मॅनेजर श्री चेतन बोरसे सर व नरडाणा पि.यू.मॅनेजर श्री. तुकाराम मासुळे सर यांनी केली.
ह्यावेळी कामपुर गावाचे सरपंच,वकील आण्णा पाटील,ग्रामसेवक योगेश महाजन, पोलिस पाटील,राजेंद्र गिरासे, उपसरपंच विष्णु पाटील, व गावातील सर्व प्रतिष्ठित शेतकरी यांच्या सोबत जमिनीवर नैसर्गिक संसाधन नकाशाची मांडणी करण्यात आली. त्यानंतर गावातील मुख्य रस्ते शासकीय कार्यालये शेततळे, जंगल पडीत क्षेत्र, विहिरी, नाले, बोरवेल, हातपंप, इतर ओळखखुणा व नैसर्गिक श्रोत यांचे व्यवस्थितपणे जमिनीवर रांगोळी व खडू यांच्या सहाय्याने मांडणी करण्यात आली. व सुची तयार केली. या वेळी पि.यु.कृषी मित्र,महेंद्र गिरासे, प्रवीण पाटील,गजानन पाटील, प्रवीण राजपूत,विनोद पवार,शरद पाटील, प्रीतम भामरे,अधिक चौधरी,दिनेश मासुळे भुषण गीरासे,लोकेश पाटील,मनोज पाटील,जयेश पाटोळे,आस्विनी माळी. व ग्रामस्थ यांनी खूप उत्स्फुर्तपणे यात सहभाग घेउन कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली. यात गावाची व शिवारा ची माहिती घेऊन त्याचे एका कार्डशीट वर रेखाटन करण्यात आले. वाया जाणारे पाणी कसे साठवता येईल इत्यादी.
सर्व गोष्टींवर शेतकरी सोबत गटचर्चा करण्यात आली. ह्यावेळी
गावातील ग्रामस्थांना गावातील वाहून जाणाऱ्या पाण्याचा आर्थिक स्वरूपात होत असलेला तोटा समजावून सांगण्यात आला. तसेच त्याचा आढावा घेऊन त्याचे सुयोग्य मूल्यमापन कसे करावे ह्या विषयी बोरसे सर व मासुळे सर यांच्या कडून मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात विविध अडचणी व समस्यांवर प्रश्नोतरे व चर्चा करण्यात आली.
शेवटी लोक सहभातुन पाण्याचा ताळेबंद करण्यात आला.
सदर विविध मुद्यांवर स्पष्टीकरण करण्यात आले.
शेतकरी वर्गास ग्रामपातळीवर पाण्याचे संधारन करण्यासाठी खालील उपाययोजनावर माहिती देण्यात आली.
1)बांध बंदिस्ती 2)नाला खोलीकरन
3) सिमेंटबांध दुरुस्ती 4)मातीबांध दुरुस्ती
5)पिण्याची पाण्याची टाकी 6)हातपंप चालु बंद
7)पाण्याचा विहरी 8)शेततळे
9) नर्सरी
10) तलाव. 11)लहान मोठ्या टेकडी. 12) जनावरे. 13) पाणी पिण्याचे हौद.
वरील विषयांवर सविस्तर व सखोल चर्चा करण्यात आली कामपुर गावातील पाण्याचा ताळेबंद यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला.
Tags
news