मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी आर. सी. पटेल क्रीडा संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा




शिरपूर : ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. आर. सी. पटेल क्रीडा संकुलात मान्यवरांच्या उपस्थितीत सदर दिवशी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

राष्ट्रीय क्रिडा दिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या प्रशिक्षकांना सदर दिवशी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार प्राप्त क्रीडा प्रशिक्षकांमध्ये खो-खो प्रशिक्षक करण शिंदे, सागर माळी, हँडबॉल प्रशिक्षक हरीश माळी, व्हॉलीबॉल प्रशिक्षक स्वप्नील पाटील यांचे कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री बालाजी संस्थान उपाध्यक्ष गोपाल भंडारी, क्रीडा विभागाचे प्रमुख प्रितेश पटेल, प्राचार्य डॉ. नितीन हासवानी, मुख्याध्यापक महेंद्र परदेशी, मनोज भंडारी, अंकुश राठी, पर्यवेक्षक एन. ई. चौधरी, क्रीडा समन्वयक राकेश बोरसे, क्रीडा संचालक वाय. बी. ठाकूर, एन. एस. राठोड, अमोल अहिरे, क्रीडाशिक्षक मनोज पाटील, दुष्यंत पाटील, डी.बी माळी, विविध शाखांचे शिक्षक व खेळाडू उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा समन्वयक राकेश बोरसे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या सर्व क्रीडा प्रशिक्षकांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने