- शहादा एसटी आगारातील वाहक प्रमोद मगनराव सोनवणे रा.प्रकाशा यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले.त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ पुणे येथील सद्गुरू सेवा फाऊंडेशनने शहादा बसस्थानकात ग्रंथालयाची स्थापना करत आगारप्रमुख व स्थानकप्रमुख यांना खुर्ची भेट देण्यात आली.यावेळी यावेळी ग्रंथालयाचे उदघाटन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ यांच्या हस्ते ग्रंथालयाचे उदघाटन करण्यात आले.प्रमोद सोनवणे यांच्या स्मृतींना कर्मचारिवर्गाने वाट मोकळी करून दिली.यावेळी वातावरण भावुक झाले होते.
शहादा आगारातील मनमिळावू स्वभाव असलेले वाहक प्रमोद सोनवणे यांचे काही दिवसापूर्वी कोरोनाने निधन झाले होते.त्यामुळे त्यांच्या कुटूंबियासह शहादा आगारावर शोककळा पसरली होती.प्रमोद यांच्या स्मृती जिवंत राहाव्यात म्हणून पुणे येथील सद्गुरू सेवा फाऊंडेशमार्फत डेपोत ग्रंथालय स्थापन करत अगारप्रमुख व स्थानकप्रमुख यांना खुर्ची भेट दिली.यावेळी महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, आगारप्रमुख योगेश लिंगायत,स्थानकप्रमुख संजय कुलकर्णी,युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन,टोकरे कोळी युवा मंचचे नितीन कोळी,राहुल सोनवणे,पुरुषोत्तम पाटील,सुरेश पाटील,आर.जे.मिरझा,शरीफ पिंजारी,सुनील सप्रे,एस.एम.शेख यांच्यासह कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.विलास पाटील यांनी आभार मानले.
Tags
news
