पर्यावरण दिनानिमित्त शिंदखेडा शिवसेनेच्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प




*शिंदखेडा (प्रतिनिधी)* : शिवसेना धुळे जिल्हा ग्रामीण मधील पदाधिकाऱ्यांची बैठक पर्यावरण दिन व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्री. अतुल सोनवणे, धुळे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाप्रमुख श्री. हेमंत साळुंके यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली.
       यावेळी शिवसेनेच्या विधानसभा संघटकपदी श्री.गणेश परदेशी, तालुकाप्रमुख (दोंडाईचा विभाग) श्री.ईश्वर पाटील, शिंदखेडा शहरप्रमुख श्री. संतोष देसले, शिरपूर शहरप्रमुख श्री. देवेंद्र पाटील यांचा नियुक्ती झाल्याने धुळे जिल्हयाच्या वतीने  सत्कार करण्यात आला. यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करतांना शिवसेनेचे कार्य जोमाने करुन शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येक गावात शाखा व घर तेथे शिवसैनिक अभियान सुरु करुन येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवु, असेही ते म्हणाले. यावेळी मंगेश पवार, विश्वनाथ पाटील, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, भरतसिंग राजपुत, सर्जेराव पाटील, तालुका प्रमुख श्री. अत्तरसिंग पावरा, छोटू पाटील, गणेश परदेशी, ईश्वर पाटील, संतोष देसले, देवेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
       शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, पद येणे-जाणे ही निरंतर प्रक्रिया आहे. परंतु पक्ष संघटन वाढण्याच्या दृष्टिकोनातुन आपसी मतभेद बाजुला ठेवून पक्षासाठी सगळ्यांनी एक दिलाने, एक जोमाने काम करावे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत व नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडुन येण्यासाठी आजपासुनच कामाला लागावे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख ज्या पध्दतीने काम करत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये दिवसेंदिवस श्री.उध्दव ठाकरे साहेबांची प्रतिमा उजाळत आहे. पक्षप्रमुखांचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा.
       श्री. हेमंत साळुंके पुढे म्हणालेत, आज पर्यावरण दिवस आहे. युवासेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस 13 जुन व शिवसेना वर्धापन दिन 19 जुन लवकरच येत आहे. मानवी जीवनात पर्यावरणाचे प्रचंड महत्व आहे. आज प्रदुषणामुळे वेळी-अवेळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, त्सुनामी असे अनेक आपत्ती मानवी जीवनावर येत आहे. कोविड-19 च्या विषाणुने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनमुळे अनेकांचे प्राण गेलेत. त्यात आपले शिवसेनेचे पदाधिकारीही गेलेत. त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोके बघता पर्यावरणाचे रक्षण करणे आपल्या सगळ्यांचे आद्य कर्तव्य आहे. म्हणुन चालु वर्ष धुळे जिल्हा ग्रामीणमध्ये आपण पर्यावरण वर्ष म्हणुन मनवु या. शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदार संघामध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प आपण करुया असे ते म्हणाले.
       यावेळी सहसंपर्क प्रमुख श्री. अतुल सोनवणे, उपजिल्हा संघटक कल्याण बागल, भाईदास पाटील, तालुका प्रमुख गिरीश देसले, दिपक चोरमले, उपजिल्हासंघटीका विनाताई वैद्य, तालुका समन्वयक विनायक पवार, युवासेनेचे प्रदीप पवार, विजय पाटील, अनिकेत बोरसे, शैलेश सोनार, राकाशेठ रुपचंदाणी, सागर देसले, नंदकिशोर पाटील, चंद्रसिंग ठाकूर, प्रताप सिसोदे, परमेश्वर पाटील, एस.डी.पाटील, वासुदेव शिंदे, रावसाहेब सैंदाणे आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने