केंद्र सरकारच्या अन्यायकारक शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्याच्या विरोधात किसान संघर्ष समन्वय समिती शिरपूर च्या वतीने आमदार काशीराम पावरा यांना निवेदन





शिरपूर - अखिल भारतीय किसान संयुक्त संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य किसान सभा किसान संघर्ष समन्वय समिती शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी विरोधी कामगार विरोधी व देश विरोधी कायदे मागे घ्या तसेच या दिवशी संपूर्ण क्रांति दिवस म्हणून घोषित करण्यात आला व ज्या ज्या ठिकाणी भाजपचे लोकप्रतिनिधी आमदार आणि खासदार यांच्या कार्यालयासमोर तीनही कायद्यांची होळी करून निवेदन देण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला आहे त्या अनुषंगाने  आज दि 5 जून रोजी शिरपूर तालुका संघर्ष समन्वय समितीच्या वतीने शिरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार मा. काशिरामजी पावरा धुळे जिल्हा व नंदुरबार जिल्हा विधान परिषदेचे आमदार मा. अमरिशभाई पटेल यांच्या कार्यालयासमोर फार्मसी कॉलेज जवळ करवंद रोड येथे समितीच्या कार्यकर्त्यांनी या काळ्या कायद्याच्या विरोधात कोरोना नियमांचे पालन करत निषेध व्यक्त केला व आमदार काशीराम पावरा यांच्या कार्यालयात संघटनेमार्फत निवेदन सादर करण्यात आले.
किसान संघर्ष समन्वय समिती शिरपुर तर्फै शिरपुर मतदार संघातील आमदार काशीराम जी पावरा यांच्या कार्यालय समोर तीन काळे काय़दे चा प्रति जाळण्यात आल्या व मोदी सरकारचा निषेध करण्यात आला दुपारी ठीक 12.30 वाजता मागण्यांचे निवेदन आमदार काशीरामजी पावरा याना देण्यात आले.
आंदोलनात किसान सभेचे जिल्हाअध्यक्ष अँड हिरालाल परदेशी,तालुका अध्यक्ष किशोर सुर्यवंशी,शहर अध्यक्ष जितेंद्र  देवरे, 
शेतकरी विकास फौंडेशनचे ता.अध्यक्ष
मोहन साहेबराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस चे हेमराज राजपुत.
सत्यशोधक आंदोलनाचे कचरू अहिरे,किसान सभेचे जेष्ठ नेते अर्जुन कोळी, रामचन्द्र पावरा,राहुल पावरा,प्रकाश पाटील,कवरलाल कोळी,शिवाजी पाटील,प्रमोद नंदलाल पाटील,आशा व गटप्रवतक संघटनेचे स्मिता दोरीक,इत्यादि कार्यकर्तै हजर होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने