*शिंदखेडा (प्रतिनिधी)* : धुळे जिल्हा ग्रामीण मधील शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आर्शिवादाने व शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्रीमान उध्दव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने, उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते खासदार श्री. संजय राऊत साहेब, उत्तर महाराष्ट्र समन्वयक श्री. रविंद्र मिर्लेकर व धुळे जिल्हा संपर्क प्रमुख श्री.बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाने खालील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे : शिंदखेडा (दोंडाईचा विभाग) तालुकाप्रमुखपदी ईश्वर पाटील, शिंदखेडा विधानसभा मतदार संघाच्या विधानसभा संघटकपदी गणेश परदेशी, शिंदखेडा शहरप्रमुखपदी संतोष देसले, शिरपूर शहरप्रमुखपदी देवेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्व नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचे शिवसेना सहसंपर्कप्रमुख श्री.अतुल सोनवणे, धुळे जिल्हा (ग्रामीण) जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, भरतसिंग राजपुत, दोंडाईचा कृ.उ.बा.स.संचालक सर्जेराव पाटील, तालुका प्रमुख गिरीश देसले, अत्तरसिंग पावरा, दिपक चोरमले, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, कल्याण बागल, विभा जोगराणा, तालुका संघटक शानाभाऊ धनगर, डॉ.मनोज पाटील, योगेश सूर्यवंशी, तालुका समन्वयक विनायक पवार, छोटुसिंग राजपुत, दोंडाईचा उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, स्थानिय लोकाधिकार समितीचे हिरालाल बोरसे, भारतीय कामगार सेनेचे विजय सिसोदे, राजु टेलर, युवासेनेचे आकाश कोळी, प्रदीप पवार, तालुका संघटीका ज्योतीताई पाटील, अर्चनाताई पाटील, विजयाताई मराठे, उपजिल्हासंघटीका विणाताई वैद्य, विजयाताई ठाकूर यांनी अभिनंदन केले.
Tags
news


