भिगवणला पावसामुळे नुकसानीची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडून पहाणी




प्रतिनिधी दत्ता पारेकर 
 
    पुणे:  भिगवण मध्ये झालेल्या पावसाने येथील कोविड सेंटर आणि थोरातनगर परिसरात मोठे नुकसान झाले होते. याची पहाणी माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली. थोरातनगर परिसरातील नागरिकांनी यावेळी सदर समस्या सोडविण्यासाठी निवेदन हर्षवर्धन पाटील यांना दिले.केंद्र शासनाच्या माध्यमातून महामार्ग यंत्रणेशी संवाद साधून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू असे प्रतिपादन हर्षवर्धन पाटील यानी यावेळी केले.
   हर्षवर्धन पाटील म्हणाले की, प्रशासनाने तात्काळ पहाणी करून पंचनामे करून घ्यावेत ज्याद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नुकसानग्रस्तांसाठी मदत मिळविता येईल.पावसामुळे भिगवण येथील थोरात नगर परिसरातील घरांचे सातत्याने नुकसान होत आहे. प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेकडील पाण्यामुळे नुकसान होत आहे याबाबत केंद्रीय रस्ते वाहतुक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचेशी चर्चा करुन राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेकडील पाणी गावाच्या बाहेर काढण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यासाठी प्रस्ताव देणार आहे.
    यावेळी सरपंच तानाजी वायसे, उपसभापती संजय देहाडे,माजी सरपंच पराग जाधव, मारुती वणवे, अशोक वणवे, अशोक शिंदे,संपत बंडगर, तेजस देवकाते, रणजित भोंगळे, संजय रायसोनी, हरिश्चंद्र पांढरे, जयदीप जाधव, कपील भाकरे, आशिष गुणवरे, ज्ञानेश्वर मारकड व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने