जनतेच्या सोयीसाठी कर्तव्यदक्ष नगरसेवक संजय पाटील यांनी तोडले शौचालयाचे कुलूप...



 ग्रामस्थांनी मांडले नगरसेवकाचे आभार!...

गेल्या दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू असलेले हद्दवाढ बाळापूर गावातील शौचालयाचे काम जेमतेम पूर्ण झाले असून  ते ही अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत.
सदर काम हे सेवा फाउंडेशन या संस्थेने केले असून त्याची देखभाल दुरुस्ती ही याच संस्थेकडे आहे .
सतत पाठपुरावा करून देखील उद्धघाटनाच्या प्रतीक्षेत असलेले हे शौचालय  आज कर्तव्यदक्ष  नगरसेवक संजय पाटील यांनी जनतेच्या शौचालय अभावी होत असलेले हाल न पाहिले गेल्याने  सदर शौचालयाचेचे कुलूप तोडून आज पासून जनतेसाठी खुले केले आहे,
 लालफिती च्या देखाव्या अभावी सर्वसामान्यांचे हाल होत आहेत, तरीदेखील मनपा प्रशासन व ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे आज जनतेच्या सोयीसाठी नगरसेवक संजय पाटील व पत्रकार दीपक वाघ यांनी एकत्र येत शौचालयाचे कुलूप तोडून जनतेसाठी आज पासून सुरू केले आहे.

 मनपा आयुक्त आणि बांधकाम विभाग यांनी सदर ठेकेदाराला जो पर्यंत नागरिकांचे समाधान होत नाही तो पर्यंत कुठल्या ही विकास कामाचे पेमेंट त्यांना अदा करू नये,असे निवेदन मागच्याच आठवड्यात नगरसेवक संजय पाटील यांच्या कडून देण्यात आले होते.
लालफिती च्या नादात लाल फित न कापता आणि देखावा न करता आज पासून शौचालय सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत , आणि आज पासून रोज स्वच्छतेची जबाबदारी ही सेवा फाउंडेशन ने पार पाडायची आहेत.असे नगरसेवक संजय पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेतून सेवा फाउंडेशनची कानउघाडणी केली आहे.
  तर पत्रकार दीपक वाघ यांनी देखील नागरिकांच्या सोयीचा प्रश्न सोडल्याने नगरसेवक संजय पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने