कत्तलीचा उद्देशाने अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनास पकडून थाळनेर पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई




थाळनेर प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशन चे सहा. पोलीस निरीक्षक उमेश बोरसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे सापळा रचून चोपडा रोडवर अवैद्य गोवंश त्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनास पकडून कायदेशीर कार्यवाही केली आहे.
 याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 8 मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास थाळनेर पोलिस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांना गुप्त बातमी प्राप्त झाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी त्यांनी एक पथक तयार करून चोपडा रोड वर अनेर मच्छी सेंटर समोर सापळा रचून वाहन क्रमांक एम. एच.19  cj 42 97 या वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये कत्तलीचा उद्देशाने गोवंश गोरे शिरपूर कडून चोपडा कडे निर्दयतेने कोंबून घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले .
सदर वाहनाच्या चालकाची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव विकास सुरेश पाटील रा। चोपडा वय 38 असे सांगितले. त्यास वाहनाच्या परवाना बाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे अधिकृत कोणतीही कागदपत्रे आढळून आले नाहीत म्हणून पंचांसमक्ष कारवाई करत पोलिसांनी अशोक लेलँड कंपनी चे दोन लाख रुपये किमतीचे वाहन व त्यात 90 हजार रुपये किमतीचे गावठी जातीचे 3 बैल असा मुद्देमाल जप्त करून संबंधित आरोपीच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 गुन्हातील  जप्त केलेली जनावरे सावेर येथील गोशाळेत पालन-पोषण करणे 
कामी दाखल करण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कांबळे करत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सो, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव सो,उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने सो, यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे , पी.एस.आय. एन.ए रसाळ, काँ.जाधव, खाटीक, पावरा, यांच्या पथकाने केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने