आ. काशिराम पावरा यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, नुकसानग्रस्तांना तातडीने मदतीसाठी प्रशासनाला सूचना



शिरपूर : तालुक्यातील पळासनेर, गारबर्डी पाड्यातील नुकसानग्रस्त भागाची आ. काशिराम पावरा यांनी पाहणी करुन नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या असून कोणाकोणाचे काय नुकसान झाले त्या सर्व नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत पुरविणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.

शनिवारी दि. २९ मे रोजी दुपारी शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील काही गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. याबाबत
माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी नुकसानग्रस्तांना योग्य ती मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच प्रशासनाने सर्व नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचा पंचनामा करून शासकीय स्तरावरून तातडीने मदत करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.


रविवारी दि. ३० मे रोजी आ. काशिराम पावरा यांनी पळासनेर व गारबर्डी पाडा तसेच इतर भागात जाऊन नुकसानीचा अंदाज घेऊन पाहणी केली. नुकसानग्रस्तांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच सर्व नुकसानग्रस्त व जखमी झालेल्यांना तातडीने मदतीबाबत आश्वासन दिले.
तसेच शिरपूर तालुक्यात वादळी वारा व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांना देखील आमदार काशिराम पावरा लवकरच भेट घेणार असून नुकसानग्रस्तांना मदत करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

आज नुकसान पाहणी करताना यावेळी शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, स्वीय सहाय्यक अशोक कलाल, स्वीय सहाय्यक सुनील जैन, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, परिसरातील सरपंच, पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने