शिरपूर -
मागील दि. 25/3/21 रोजी आपल्या दि शिरपूर मर्चंट को-ऑप. बॅंकेची तथाकथित वार्षिक सभा ऑनलाईन घेण्यात आली. सभेला फक्त दोन संचालक व चेअरमन हजर होते व सात हजार सभासद पैकी पन्नास सभासद म्हणजे खरंच बॅंकेच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो ? शासनाने ऑनलाईन जरी मिटींग घेण्याची परवानगी दिली असली, तरी सभासदांना पंधरा दिवस आधी वार्षिक अहवाल मिळाला पाहिजे हे सुध्दा त्यांत नमूद आहे. तो मुद्दा माहित असूनही सन 2019-20 चा अहवाल/वार्षिक ताळेबंद आजपावेतो सर्व सभासदांना बँकेने दिलेला नाही. बँकेने 19 मार्च या तारखेपर्यंत सभासदांतर्फे लेखी प्रश्न मागीतले होते. अहवाल नसल्यामुळे अनेक सभासदांना ते लेखी देता आले नाही. ज्यांनी प्रश्न दिले, त्याचे उत्तर आजपावेतोही मिळाले नाही,लेखी उत्तर देण्यास टाळाटाळ होते, त्यामुळे या बँकेची सन 2019-2020 ची तथाकथित ऑनलाईन सर्वसाधारण सभा पूर्णपणे बेकायदेशीर होती ,असे आम्ही जाहीर करून जिल्हा निबंधक सो।सहकारी संस्था यांच्याकडे न्याय मिळण्यासाठी लवकरच तक्रार दाखल करणार आहोत . बँकेचा नफा खूप कमी झालेला आहे. अहवालानुसार बँक 'क ' वर्गात गेली आहे. अनेक बेकायदेशीर कर्जे दिलेली आहेत.NPA एनपीए खोटे आकडेवारी दाखवुन कमी केलेला आहे. तारण कर्जावर हेराफेरी केली आहे .असे अनेक घोटाळे आहेत .सर्व साधारण सभासदांची ही बँक वाचावी हाच आमचा उद्देश याच्यात आहे.सभासदांनो आपल्या न्याय्य हक्कासाठी जागृत व्हा.
आपले नम्र:- मर्चंट बँक बचाव समिती नानासो. मोहन साहेबराव पाटील, गोपाल कन्हैयालाल मारवाडी,
ईश्वरभाऊ रतिलाल बोरसे
Tags
news
राषट्रउदयचा चागला संपादक आपल्यातून हरपला
उत्तर द्याहटवारत्नदीप भाऊला दुःख सहन करण्याची शक्ती देव परमेश्वर
ओम शांती