धुळे - कल्याण-डोंबिवली चे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी झूम मीटिंग द्वारे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या पदाधिकार्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले
शिवसेने आतापर्यंत ८०टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे सुत्र अंगिकारले आहे त्या अनुषंगाने राज्यभर अनेक ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची निर्मिती केली आहे या कक्षाची डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात फौंडेशन चा विस्तार होत असल्याचे दिसून येत आहे
याबाबत डॉ श्रीकांत शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.१४ जिल्ह्यापर्यंत झालेला हा विस्तार आणि हळू हळू संपूर्ण राज्यभर करण्याच्या प्रयत्न करावा अशी सूचना देखील त्यांनी शिवसैनिकांना दिल्या यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी कोव्हीड संकट काळात दिवस रात्र मेहनत घेऊन काम करीत आहेत अशावेळी सर्वांनी स्वतःची व आपल्या परिवारजनांची तितकीच काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले. याप्रसंगी काही पदाधिकाऱ्यांनी काम करत असताना येणाऱ्या अडीअडचणी माङंल्या यावर खा.ङाँ.शिंदे यांनी यातून कसा मार्ग काढता येईल याचे देखील मार्गदर्शन केले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी उत्तर महाराष्ट्र समन्वयक योगेश म्हस्के यांच्या कामाचे कौतुक केले.
व धुळे जिल्हा समन्वयक महावीर जैन यांनी सांगितले कि, शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांचे बिल कमी करणे,ऑक्सिजन उपलब्ध करून देणे,बेड उपलब्ध करणे देणे अश्या सगळ्या समस्या सोडविण्याचे काम शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून करत असल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना शिवसेना पक्ष एक आधार वाटू लागला आहे हे त्यांच्या चेहऱ्यावर बोलण्यावरून दिसु लागले आहे.
या बैठकीस शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य समन्वयक मंगेश नरसिंह चिवटे, यावेळी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक राजाभाऊ भिलारे उत्तर महाराष्ट्र समन्वयक योगेश म्हस्के, तसेच सर्व राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. कोव्हिड चा प्रादुर्भाव पाहता प्रत्यक्ष पणे बैठक न घेता झुम मिटींगाचे आयोजन केल्याचे शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केले
Tags
news
