पत्रकार बांधवांना निःशुल्क कोरोना प्रतिबंध लस द्यावी जिल्ह्यात ICU,बेड व व्हेंटिलेटर संख्या तात्काळ वाढविण्यासंदर्भात केंद्रीय पत्रकार संघाची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी





धुळे-कोरानाच्या संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी डॉक्टर्स , नसेंस , पोलिस यांच्या प्रमाणेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन ओळखल्या जाणा - या पत्रकारांनीही रस्त्यावर उतरुन सर्वात पुढे राहुन लोकसेवा केली आहे . या पार्श्वभूमीवर जिल्हयातील पत्रकारांना तात्काळ निःशुल्क कोरोना लस दयावी. तसेच निशुल्क आरोग्य सोयी सुविधा पुरवाव्यात'जिल्ह्यात
जिल्ह्यात ICU,बेड व व्हेंटिलेटर वाढवावे यामागणीचे निवेदन आज धुळे जिल्हा केंद्रीय पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.

 धुळे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोविड -१ ९ संक्रमणाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत . त्यात ऑक्सिजनची, व व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे . परंतु जिल्ह्यातील वाढती कोविड -१ ९ रुग्णसंख्या बघता ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर  जिल्हा रुग्णालय व मनपा रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे . या कारणामुळे अनेक रुग्णांना जिल्ह्याबाहेर उपचारासाठी जावे लागत आहे ; परंतु गरीब रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अशा रुग्णांना धुळे जिल्हा रुग्णालयाशिवाय पर्याय नाही . असे अनेक कोरोना संसर्ग रुग्णांना जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून , वेळप्रसंगी जीव गमवावा लागत आहे..
 तर कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे त्यामुळे जिल्ह्यात रेमडेशिवीर इंजेक्शन औषधाचा पुरवठा वाढवावा.व जादा दराने औषधांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी 
अशी मागणी केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे जिल्हयातील पत्रकारांच्या या मागणीचा प्रस्ताव राज्यशासनाला पाठवावा अशी मागणीही करण्यात आली आहे..

 निवेदनदेते वेळी केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख दिपक वाघ,  ज्येष्ठ पत्रकार यशवंत हारणे, केंद्रिय पत्रकार संघाचे शहराध्यक्ष पवन मराठे, महासचिव गणेश पवार, केंद्रीय पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुनील निकम, व जिल्हा सचिव रोशन खैरनार आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते...

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने