प्रा. सौ. माधुरी पाटील यांच्या वाढदिसनिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात किराणा वस्तूंचे वाटप*



वाढदिवस म्हटला, की खर्च आलाच. मित्रांना पार्टी देणे, मोठमोठे समारंभ, जेवणावळी यावर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन प्रा. सौ.  माधुरी पाटील यांनी संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. नकाने तलावाजवळील मातोश्री वृद्धाश्रमात आवश्यक वस्तूंचा किराणा सामान देऊन त्यांनी वाढदिवस साजरा केला,अशा स्तुत्य उपक्रमाने त्यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला. संकल्प फाउंडेशन ही संस्था विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असते. या वेळी संस्थेचे प्रा. भूषण माळी व प्रा. आमोद पाटील  उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या माध्यमातून अनावश्यक खर्च न करता त्यांनी या प्रेरणादायी उपक्रमाने आजच्या युवापिढीसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. प्रा. माधुरी पाटील या संकल्प फाउंडेशनच्या अनेक उपक्रमात सहभागी असतात. या कार्यक्रमाबद्दल मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक श्री. धीरज धनगर यांनी समाधान व्यक्त केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने