धुळे -शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पत्रकारांसाठी कोरोणा लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात यावी या मागणीचे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन देण्यात आले.
पत्रकार संघाच्या या मागणीला जिल्हाधिकार्यांनी हिरवा कंदील दिला असून लवकरच दैनिक, साप्ताहिक, तसेच विविध नियतकालिकं, इलेक्ट्रॉनिक मीडियातील 45 वर्षावरील पत्रकारांसाठी लसीकरणाची मोहीम राबविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी संजय यादव आणि धुळे महापालिकेचे आयुक्त अजीज शेख यांनी दिले आहे.
सदर लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यातील दैनिक,साप्ताहिक, नियतकालिक,इलेक्ट्रॉनिक मिडीयातील संपादकांनी आपल्या आस्थापनांमध्ये काम करणार्या 45 वर्षावरील पत्रकारांची यादी तसेच त्यांच्या कुटूंबातील सदस्यांची यादी,कोविड 19 च्या नियमावलीनुसार धुळे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.महेश मोरे यांच्या कार्यालयाकडे दि.19 तारखेपर्यंत सादर करावी तसेच लसीकरण मोहिमेच्या दिवशी आधार कार्ड आणि संपादकांचे शिफारस पत्र सादर करून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे जिल्हाधिकारी संजय यादव आणि मनपा आयुक्त अजीज शेख यांना निवेदन देतेवेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पाटील सचिव धनंजय दीक्षित उपस्थित होते
Tags
news
