अनेरडॅम अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश बंदी




धुळे, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 30 एप्रिल 2021 पर्यंत लॉकडाऊन घोषित केलेले आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील अनेरडॅम वन्यजीव अभयारण्यासह कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य (अहमदनगर), नांदूर- मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य (नाशिक), यावल वन्यजीव अभयारण्यात (जळगाव) 30 एप्रिल 2021 पर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती नाशिकचे वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अ. मो. अंजनकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. 


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने