औरंगाबाद : कडुबा बारकू शेळके रा.कायगांव तालुका सिल्लोड यांना जमिनीचा 7/12 उतारा तात्काळ मिळावा अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष केशव पवार यांनी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सिल्लोड जिल्हा औरंगाबाद यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तहसीलदार तहसिल कार्यालय सिल्लोड यांनी मा.उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांना दिलेले दिनांक 09/06/2016 रोजीचे पञान्वये श्री. कडूबा बारकु शेळके रा.कायगांव तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद यांच्या मौजे कायगांव शिवारातील गट क्रमांक 78 मधील 2 हेक्टर गायरान शेत जमीन कागदोपत्री अतिकमीत केलेले आहे व ती जमीन नावाने होण्यासाठी मागणी केलेली आहे, अशा आशयाचे पञ मा.तहसीलदार सिल्लोड यांनी मा.उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांना एकूण 7 कागदपञांच्या आधारे दिनांक 09/06/2016 रोजी दिलेले आहे. 5 वर्षे होत आली तरी सदर पञानूसार अर्जदार श्री. कडुबा बारकू शेळके यांना अद्याप त्या जमिनीचा 7/12 उतारा मिळालेला नाही. ही एक गंभीर बाब आहे. त्यामुळे अर्जदारास अनेक अडचणी येत आहेत. म्हणून श्री. कडूबा बारकू शेळके यांना तात्काळ सदर जमिनीचा 7/12 उतारा देण्यात यावा.हीच नम्र विनंती. अन्याय अर्जदारास सोबत घेऊन बिरसा क्रांती दल संघटना आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडेल. याची नोंद घ्यावी. अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे केशव पवार जिल्हाध्यक्ष औरंगाबाद यांनी उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांच्या कडे केली आहे.
Tags
news
