*आँक्सिजन कमी पडत असल्याने रुग्ण व नातेवाईक चिंतेत जिल्हयाला मोठ्या प्रमाणावर आँक्सिजनचा साठा पूरवा..!*
*जिल्हा रुग्णालयाला नवीन आँक्सिजनची टाकी तयार करा..!*
*खाजगी रुग्णालयामध्ये रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कार्यवाही करा..!*
*कामात कसूर करणाऱ्या आणि वेळ काढू पणा करणाऱ्या धुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सांगळे यांना निलंबित करा..!*
*आमदार फारूक शाह यांनी आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांच्या घरी जाऊन भेट घेत केली सविस्तर चर्चा..!*
(धुळे दि. १३-०४-२०२१) राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आँक्सिजन व व्हेंटीलेटर कमी पडत असल्यामुळे रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अशीच परिस्थिती धुळे शहरात निर्माण झालेली आहे. धुळे जिल्हयासाठी २०० व्हेंटीलेटर बेड तसेच जास्तीत जास्त आँक्सिजन युक्त बेड आणि मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन साठा उपलब्ध करून देण्यात यावा. धुळे जिल्ह्यात रेमडीसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असून जिल्हयात काही मेडिकल स्टोर्सवाले लोकांकडून जास्तीचे पैसे घेऊन इंजेक्शन देत आहेत. तरी शासनाच्या निर्देशाप्रमाणे अश्या मेडिकल्सवर किवा चढ्या दराने रेमडीसिवीर इंजेक्शन विक्री करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही व्हावी आणि धुळे जिल्हयासाठी जास्तीचे इंजेक्शन उपलब्ध करून दयावे. खाजगी रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांनकडून शासनाच्या निर्देशांचा उल्लघन करून जास्तीचे बिल आकारणी केली जात आहे. अश्या रुग्णालयाव कार्यवाही व्हावी तसेच प्रत्येक खाजगी रुग्णालय बाहेर शासनाचे दर पत्रक लावण्याचे तात्काळ निर्देश देण्यात यावे. तसेच धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेतून जिल्हा रुग्णालय धुळे येथे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण दाखल झालेले आहेत त्यांना त्याठिकाणी नवीन आँक्सिजनची टाकी तयार करून देण्यात यावी. वेळोवेळी प्रशासनाने आणि आम्ही दिलेल्या सूचनांवर काम न करत कामात कसूर करणाऱ्या आणि वेळ काढू पणा करणाऱ्या धुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सांगळे यांना निलंबित करावे व र्यांच्या ठिकाणी कर्त्यव्यदक्ष जिल्हा शल्यचिकित्सक दयावा. या आशयाचे निवेदन घेत आमदार फारूक शाह यांनी धुळेकर जनतेची कैफियत थेट आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांच्या घरी जाऊन भेट घेत मांडली आणि वरील आशयाचे निवेदन सादर करत दीर्घकाळ विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
Tags
news
