जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग! हॉटेल चालू ठेवून गर्दी जमवल्याने केली कारवाई



प्रतिनिधी दत्ता पारेकर 

पुणे:राज्यात  कोरोनाचा उद्रेक झाला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने पुणे जिल्ह्यात दि.३ एप्रिल पासून पुढील सात दिवस शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले असून या आदेशाचे पालन न केल्याने इंदापूर पोलिसांनी शहरातील हॉटेल चालकावर कारवाई केली आहे.

याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पुणे यांच्या दि.२ एप्रिल २०२१ च्या आदेशान्वये दि. ३ एप्रिल २०२१ पासून पुढील सात दिवस/पुढील आदेशापर्यंत संपूर्ण हॉटेल बंद राहतील व फक्त पार्सल सेवा चालू राहील असा आदेश असताना देखील इंदापूर शहरात गस्त घालत असते वेळी आज दि.४ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास इंदापूर शहरातील बाबा चौक येथे सूर्यकांत दगडू जाधव रा.४० फुटी रोड इंदापूर यांनी त्यांच्या मालकीचे हॉटेल गिरीजाई चालू ठेवून हॉटेलमध्ये गर्दी जमवून खाद्यपदार्थाची विक्री करीत असताना मिळून आल्याने व जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाचा भंग केल्याने हॉटेल चालकावर भादवि कलम १८८ , २६९ ,२७० महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ ( w ) ( n ) आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २००५ चे ३० , ३३ ,३४ ,४१ , ५१ व भारतीय साथ रोग कायदा १८९७ कलम ३ , ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून याबाबतची फिर्याद पो.काँ अमोल रामदास गारुडी नेमणूक इंदापूर पोलीस स्टेशन यांनी दिली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने