मालपुर ता.शिंदखेडा ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष.



(प्रभाकर आडगाळे.) 

शिंदखेडा तालुक्यातील मालपुर हे गावमोठे असुन येथील ग्रामपंचायतीत सतरा मेंबर असुन  स्वच्छता माञ दिसत नाही. वारंवार वूत्तपञातबातम्या लावुन देखील त्यांचा कामात बदल झालेला दिसुन येत नाही .हेच खरे मालपुरकरांचे दुभाग्य समजावे. सध्या कोरोना चा प्रादुभाव मोठ्या प्रमाणात असुन देखील साफ सफाई करतांना दिसत नाहीत  संपुर्णगावात गटारी तुडुंब भरलेले असुन अक्षरक्षा घाण वास येतो.डासाचे प्रमाण खुपच वाढल्यामुळे  सर्दी ,खोकलासारखे आजारांना जनता तोंड देत आहे . खाजगी दवाखाना फुल्लभरलेले दिसुन येतात माञ ग्रामपंचायत साधी धुळफवारणी देखील करत नाहीत. मागच्या वर्षी ट्रक्टरने संपुर्ण गावातधुळ फवारणी केली होती .यावर्षीमाञ दुर्लक्ष दिस न येत आहे. जुना साक्री रस्ता वर  म्हणजे राजु सायकल मार्ट ते पाण्याची टाकी पर्यत घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसुन येत आहे. मशानभुमीकडे जाणारा रस्ता देखील घाणीचे साम्राज्य आहे .हे ग्रामपंचायतला दिसत असुन अनदेखी करुन चालत आहेत तरी आरोग्य विभागाने दखलघ्यावी अशी मागणी आहे. धनगर गल्लीत तर गटारीचे.पाणीच आडविले जाते.नालीत दगड ठेवुन मन मानी करण्यार्‍यांना पंचायत बोलण्यास तयार नाहीत. तरी ग्राम विकास आधिकारी याकडे लक्ष देतील काय?.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने