कोरोनाने जनता हैराण स्थानिक आमदारानी घराबाहेर पडावे, जिथे गरज आहे तिथे मेहनत का घेत नाहीत- राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे नेते संदीप बेडसेंचा आरोप




कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता  १७२ गावांमध्ये स्टीमर ( गरम वाफेचे मशीन ) वाटप

प्रतिनिधी. प्रभाकर आडगाळे मालपुर ता.शिंदखेडा 

         संपूर्ण राज्यभरात कोरोनाचा प्रभाव हा दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे अशात धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात प्रामुख्याने कहर केल्याचं दिसून येतंय गेल्या पंधरा दिवसात शिंदखेडा तालुक्यात गावागावात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. प्रत्येक गावात वाढती रुग्णाची संख्या लक्षात घेता राज्य सरकार माध्यमातुन आरोग्य यंत्रणा अधिकच जोमाने काम करत असली तरी ग्रामीण भागातील ग्रामपंचायत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ती सोयीसुविधांचा अभाव आहे कारण गेल्या १५ वर्षांपासून स्थानिक आमदार रावलांनी जनतेच्या हिताची कामे केलीच नाही.  गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या महामारीशी राज्यसरकार लढत आहे. प्रशासन अहोरात्र काम करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रत्येक गावात एक स्टीमर ( वाफ घेण्याचे मशीन ) पुरवण्यात आले तालुक्यातील १७२ गावांमध्ये हे स्टीमर पोचणार आहे कोरोनाचा प्रभाव हा कमी करण्याकरिता नागरिकांनी काळजी घ्यावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आवाहन करण्यात आले

       
१) धमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारी 20 गावे

२) निमगुळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारी २० गावे

३) विखरण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारी १७ गावे

४) मालपुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारी १३ गावे

५) चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारी २४ गावे

६) वालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारी १५ गावे

७) नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारी २२ गावे

८) बेटावद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारी १२ गावे

९) दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारी ३१ गावे
तसेच शिंदखेडा रुग्णालयात तर दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात असा पुरवठा करण्यात आला आहे. सध्याची परिस्थिती भयावह असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रत्येकाने मास्क तसेच सॅनिटायझर व एकमेकांपासून चार-पाच फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. अशा सूचनांचे पालन केले तरच आपण या महामारी पासून मुक्त होवु.

तर, केंद्रात भाजपची सत्ता आहे आमदार रावळाना जनतेने चौथ्यादा निवडून दिले आहे. घरात बसून राहण्याच काम नाहीय बाहेर पडा. प्रत्येक रस्त्याची काम करतांना भाजपची माणसे म्हणतात आम्ही चार वेळा आमदार आहोत जिथे तिथे मलिदा खाण्याचे काम करतात. जनतेला तुमची गरज आहे केंद्र सरकार म्हणजेच मोदींची मदत घ्या गळा फाडून बोलणारे फडणविसांची मदत घ्या, आणि कोणतेही राजकारण न करता रेमडीसीवर कोव्हक्सींनसाठी लस उपलब्ध करून दया. प्रत्येक वेळी राजकारण न करता नैतिक जबाबदारी स्वीकारा असा घणाघात संदीप बेडसेंनी यावेळी केला.

सोबत
सत्यजित सिसोदे उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक महाराष्ट्र प्रदेश,
डॉ कैलास ठाकरे तालुकाध्यक्ष शिंदखेडा,
 ऍड . एकनाथ भावसार शहराध्यक्ष
दोंडाईचा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , प्रवीण पाटील शहराध्यक्ष शिंदखेडा,
ईश्वर पाटील मंदाणे , रहीम मंसुरी मा.नगरसेवक, आबा मुंडे धमाणे, कुवर सर दोंडाईचा,
जिल्हा संघटक दुर्गेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष कमलाकर बागले,  सामाजिक न्याय दोंडाईचा शहराध्यक्ष दादाभाई कापुरे,  डॉ. शांताराम पाटील,अमृत पाटील सुराय ,निखिल पाटील , आनंदा सोनवणे धमाणे, हंसराज पाटील, अनिल पाटील विरदेल, हिम्मत आप्पा  चीलाने, राजू नाना गिरासे वरसुस,   गुलाब पाटील चिलाने, मित्तल बेहेरे विरदेल,
सागर वाडीले रंजाणे, महेश पाटील,  विशाल पाटील गोराणे, श्याम पाटील हातनूर, मुस्ताक फकीर, शिवा खंडाळे दोंडाईचा, मनोज मोरे वर्षी, सतीश बेहरे वारुड, वीरेंद्र पवार अमळथे, प्रेमसिंग गिरासे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने