भिलटपाडा ते जामण्यापाडा रस्ता दुरूस्तीला सुरवात



प्रतिनिधी, शिरपूर
             नव्यानेच निवडून आलेले जामण्यापाडा ग्रामपंचायतिचे उच्चशिक्षित तरूण सदस्य तथा बिरसा क्रांती दलाचे धुळे जिल्हा महासचिव विलास पावरा यांच्या प्रयत्नातून मागील 9 वर्षांपासून दुरावस्थेत असलेल्या रामा 1 पासून जामण्यापाडा पर्यंतच्या रस्ता दुरूस्तिला अखेर सुरवात झाली. यामुळे गावकरी अत्यंत आनंदात आहे. 
            तालुक्यातील रामा 1 (भिलटपाडा) पासून ते जामण्यापाडा पर्यंतचा 3 किमी चा रस्ता अत्यंत दुरावस्थेत होता. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात प्रचंड हाल सहन करावे लागत होते. त्यातच गरोदर महिला, वृद्ध यांना दवाखान्यात घेवून जाणे म्हणजे तारेवरची कसरत असायची. ही परिस्थिती बदलण्यासाठी नवनियुक्त ग्रा.पं. सदस्य विलास पावरा यांनी लागलिच पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले असून, सदर रस्त्याचे नुकतेच ग्रामपंचायत सदस्य विलास पावरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याकामी सा. बां. उपविभागाचे सेवानिवृत उपअभियंता विजय मंगळे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी जि. प. उपविभाग शिरपुरचे शाखा अभियंता मंडपे साहेब, ठेकेदार महेंद्र पाटील, ग्रामीण युवक कांग्रेसचे तालुकाध्यक्ष गेंद्या पावरा, भाईदास पावरा, ग्रा. पं. सदस्य जयसिंग पावरा, सिकराम पावरा, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने