संतोष पाटील यांचे सेट परीक्षेत यश




शिरपूर : येथील दि शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय बभळाज येथील उपशिक्षक संतोष नानाभाऊ पाटील यांनी राज्य पात्रता परीक्षेत मराठी विषयात यश संपादन केले. डिसेंबर 2020 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या यंत्रणेमार्फत राज्य पात्रता परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून संतोष पाटील यांनी या परीक्षेत पात्रता संपादन केलेली आहे.
 तत्पूर्वी त्यांनी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पेट  परीक्षा व  विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षेत  यश प्राप्त केलेले आहे.माध्यमिक विद्यालयात सेवेत असतानाही त्यांनी विद्यापीठ पातळीवरील राज्य व राष्ट्रीय पात्रता परीक्षेत यश मिवविले आहे.तसेच दोन आंतरराष्ट्रीय व सात राष्ट्रीय व तीन राज्यस्तरीय चर्चासत्रात सहभाग घेऊन शोधनिबंध सादर केले आहेत. तर विविध वृत्तपत्रात साहित्यिक पुरवणीत विविध विषयांवर लेखन करीत आहेत. त्यांचे मराठी विज्ञानकथा विषयावरील पीएचडी साठी साहित्य संशोधन ही सुरू आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षण मंत्री आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संस्थेचे सचिव प्रभाकरराव चव्हाण, विद्याविहार हाउसिंग सोसायटी चेअरमन अशोक कलाल, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य डाॕ.डी.आर.पाटील , डाॕ.एम.के.कदम, प्राचार्य पी.व्ही.पाटील, बभळाज  विद्यालयाचे प्राचार्य आर.एन. पवार, प्राचार्य पी.आर.साळुंखे , विविध शाखांचे मुख्याध्यापक , शिक्षकवृंद  नातेवाईक व मित्रांनी अभिनंदन केले.

--

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने