शनिमांडळ-रजाळे फाटा परिसरात शेतात मजुराचा वीज पडून जागीच मृत्यू




नंदुरबार/ तालुक्यातील शनिमांडळ-रजाळे फाटा परिसरात आज दि.14 एप्रिल रोजी  11 वाजेच्या सुमारास गुरांना चारा कापीत असताना अचानक विजांचा कडकडाट झाल्याने वीज अंगावर पडुन  शनिमांडळ तिलाली येथील 32 वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी एकच हंबरडा फोडला. मृत्यूची बातमी शनिमांडळ परिसरात पसरताच नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शनिमांडळ परिसरात आज  सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने सकाळी 11 ते 12 वाजेच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट होत असल्याने रजाळे-शनीमांडळ फाटाजवळ राजू भरवाड यांच्या  शेतात रवींद्र रामदास भिल (वय 32 रा. तीलाली शनिमांडळ ता. नंदुरबार) हा तरूण  गुरांसाठी चारा कापीत असताना त्याच्या अंगावर अचानक वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी एकच गर्दी केली होती. यावेळी पोलीस पाटील,रजाळेचे पोलिस पाटील मांगिलाल पाटील  व शनिमांडळ ग्रामपंचायत सरपंच योगेश पाटील, भाजपाचे मुन्ना पाटील, कोतवाल हर्षल सावंत यांनी घटनेची पाहणी करून तलाठ्यांना पंचनामा करण्याविषयी सांगितले. रवींद्र भिल यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील असा परिवार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने