दोंडाईच्यात रेमडीसिवर नाही मग पेशंट ने करायचे तरी काय ? तुमची सगळी ताकद अन आमचा एक फोन म्हणणारी कुठे?




 दिग्विजयसिंग राजपुत*
       शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा परीसरात कोरोना वायरस ने थैमान घातले असून  दोंडाईचा शहरात कोरोना चे रुग्ण संख्या खूप वाढली आहे. निमोनिया व कोरोना चे लक्षणे जास्त दिसून येत आहे रुग्ण संख्या वाढली असल्यामुळे रेमडीसिवर इंजेक्शनचा पुरवठा होत नाही आहे रुग्णांचे नातेवाईक परीसरातील सर्व मेडिकल दुकाने फिरून आले पण त्यांना कुठेही रेमडीसिवर इंजेक्शन मिळत नाही धुळे,शिरपुर, शहादा व नंदुरबार शहरात रुग्णांना रेमडीसिवर उपलब्ध होते पंरतु दोंडाईच्यात का नाही ? दोंडाईच्यात नेत्यांच्या घरात रेमडीसिवर असून देखील ते पेशंट ला देऊ शकत नाही तर त्यांचे देव्हाऱ्यात ठेवून पुजा करत बसा असे पेशंट चे नातेवाईक बोलून संताप व्यक्त करताना दिसून येत आहे दोंडाईच्यातील रेमडीसिवर चा काळाबाजार मनसे विध्यार्थ्यी सेना शिंदखेडा तालुका/धुळे जिल्हा जनतेसमोर काढल्या शिवाय राहणार नाही असे मनसे विध्यार्थ्यी सेनेचे दिग्विजयसिंग राजपुत यांनी म्हटले.
      कोरोनाच्या गंभीर संकटात सर्वसामान्य जनता मुकाबला करत असताना वैद्यकीय सेवेच्या पांढरपेशा मुखवट्या खाली राजरोसपणे लुटमार करीत आपल्या पवित्र पेशाला बदनाम करणारे बहुतांश डॉक्टर रूपी राक्षस यांच्या लुटीचा सुरस कथा उघड होत आहेत कोरोनाच्या नावाने लुठमार चालू आहे पेशंट ला रेमडीसिवर ची अत्यावश्यक गरज असताना रेमडीसिवर मिळत नाही मग तरीही जनसेवेचे नाटक करणारे, चमकोगिरी करणारे राजकीय पक्ष, नेते, नेत्यांचे कट्टर कार्यकर्ते गप्प का ? एवढी लुठमार खुलेआम सुरू म्हणजेच त्यांनाही यातील वाटा मिळत असावा अशी चर्चा सुरू   
     *जशी मतदाना साठी पुढारी धावपळ करता* तशी आपले जे मतदार, कोरोना पॉजिटीव आले असतील.
त्यांच्या साठी ही अशा वेळेस थोडी धावपळ करावी तुमच्या कडे जे रेमडीसिवर इंजेक्शनाचा साटा आहे तो आपल्या मतदार संघातील कोरोनाच्या रूग्णांना द्या अन्यथा तुम्हांला सामान्य जनता गावात सुद्धा घूसू देणार नाही असा नेत्यांना मनसे विध्यार्थ्यी सेनेचे शिंदखेडा  तालुका संघटक दिग्विजयसिंग राजपुत यांनी टोला दिला.
       तुमची सगळी ताकद अन आमचा एक फोन म्हणणारी कुठे ? इंजेक्शन, औषध, बेड, ऑक्सिजन भेटत नाहीयेत मग आता लावा ना तुमचा फोन गरीब कोमात आणि श्रीमंत जोमात व्हा सोशल मिडीयावर नावासाठी प्रसिद्ध होणारे कुठे ? बंद करा तुमचे धंदे सामान्य जनता माफ करणार नाही असे मनसेचे दिग्विजयसिंग राजपुत म्हणाले
     शिंदखेडा तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थ्यी सेनेची व सामान्य नागरिकांची मागणी आहे की, धुळे जिल्हाधिकारी व प्रशासनाने जनतेची काळजी करून रेमडीसिवर उपलब्ध करून द्यावेत आणि धुळे जिल्हा शिंदखेडा तालुक्यातील आमदार खासदारांनी पण आपल्या जनतेची काळजी करावी व जनतेसाठी योग्य ती सोय करावी..!
आपलाच मनसे सैनिक
*दिग्विजयसिंग राजपुत*
(महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थ्यी सेना)
मो.9860679223

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने