शिरपूर -दिनांक 14 एप्रिल 2021 रोजी ग्रामपंचायत गु-हाळपाणी अंतर्गत प्रधानदेवी पाड्यावर कोरोना बाबत जनजागृती करण्यात आली. गावात ग्रामपंचायत मार्फत फवारणी करण्यात आली. तसेच गावातील सर्व नागरिकांना कोरोना ॲटीजन टेस्ट करण्याचे आवाहन करण्यात येवून गावातच तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सदर आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. सदर तपासणी शिबीरात वकवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन पवार, एम. पी. डब्ल्यू. श्री. पवार, ए. एन. एम. सौ. बी. एस. पावरा, ग्रामसेवक श्री. डी. बी. तिरमले, तलाठी श्री. एस. टी. कोकणी, पोलीस पाटील श्री. सरकार पावरा, अंगणवाडी सेविका सुडीबाई पावरा, आशा फुगरीबाई पावरा, सांगवी पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.
Tags
news
