■ कोव्हीड चाचणीस जावदे त.ह. येथे उत्कृष्ट प्रतिसाद




शहादा (प्रतिनिधी) :- शहादा तालुक्यातील जावदे त.ह. येथे सर्दी, ताप, खोकला असलेल्या रुग्णांची कोव्हीड चाचणी करण्यात आली. त्यात नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. मोबाईल टीम द्वारे जावदे त.ह. येथे १६५ जणांची कोव्हीड चाचणी करण्यात आली. ग्रामीण भागात मागील काही दिवसांत कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे . त्यामुळे आरोग्ययंत्रणेसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे . 
            अनेकदा सर्दी , ताप, खोकला असलेले नागरिक डॉक्टरांना खरी माहिती देत नाहीत . त्यामुळे कोव्हीडचा प्रादुर्भाव वेगाने होतो , असा अनुभव आहे . त्यावर उपाय म्हणून आता तीन दिवसांपर्यंत सर्दी , ताप , खोकल्याची लक्षणे दिसताच रुग्णांचे स्वब घेतले जात आहेत . विशेष म्हणजे गावात दवंडी देऊन अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी कोविड टेस्ट करवून घ्यावी, असे आवाहन ग्रामीण भागात केले जात आहे. साधा सर्दी , ताप , खोकला असेल तरी रुग्णांनी उपयोजना म्हणून आपली कोव्हीड चाचणी करून घ्यावी.
         यावेळी जावदे त.ह. येथे कोव्हीड चाचणीची तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाघर्डे तर्फे मोबाईल टीम पाठविण्यात आली होती त्यास जावदे त.ह. येथे उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. त्यावेळी डॉ. बी.डी. निकम, डॉ. हेमंत बच्छाव, डॉ. गोपीनाथ नरसुदे, डॉ. विनायक गिरासे, परमार नाना, सामुद्रे नाना,  राठोड मॅडम, शोभा सोनवणे आदी उपस्थित होते.

◆ग्रामपंचायत प्रशासनाची उपस्थित नाही. 
          जावदे त.ह. येथे मोबाईल टीम द्वारे कोव्हीड चाचणी करण्यात आली त्यावेळी ग्रामपंचायत प्रशासन म्हणून एकही सदस्यची उपस्थित नाही. गावात कोव्हीडचे रुग्ण आढळत असताना देखील अघ्यापी गावात जंतूनाशक (सॅनिटायझर) ची फवारणी झालेली नाही. अनेक दिवसांपासून गावात ग्रामसेवक येत नसल्याचे तक्रारी गावकरी करीत आहेत. ग्रामपंचायत प्रशासन गेले तरी कोठे? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने