सूर महाराष्ट्रात गारवा सुपरहीट उन्हात गारवा सर्वांना हवा हवा.. 1200 पेक्षा अधिक प्रेक्षकांनी गाणे पाहिले स्पर्धेत एकाच दिवसात सर्वाधिक लाईक्स




रत्नागिरी   : "सूर महाराष्ट्राचा" मराठी गीत गायन स्पर्धेतही स्पर्धक सुशीलकुमार पावरा यांनी आपल्या आवाजाने सर्व प्रेक्षकांना चकित केले आहे. एका सामाजिक कार्यकर्ताचा आवाज एवढा गोड असू शकतो. याबाबत काही लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे व सुशीलकुमार पावरा यांचे मनभरून कौतुक केले आहे. 
 सुशीलकुमार पावरा यांना गाण्याची लिंक काल राञी मिळाली होती.ती सोशल मिडीयावर जोरात वायरल झाली व आपल्या आवाजाने व परफार्मसने पावरानी प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. पहिल्याच दिवशी सुशिलकुमार पावरा यांच्या गाण्याला 1200 पेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे व 312 पेक्षा अधिक लाईक्स दिले आहेत. त्यामुळे 10 दिवस अगोदर सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांना पावरा यांनी मागे सोडले आहे. युटूब  वरील सर्व विडीओस तपासण्यात आले.त्यात पावराला एका दिवसात मिळालेले लाईक्स व पसंती एवढे कुणाचेच लाईक्स व व्ह्यू नाहीत. 
         उन्हाळ्याचे दिवस आहेत कडक ऊन पडत आहे.या उनातही पावरा यांचा गारवा गाणे सगळ्यांनाच आवडत आहे.म्हणून सध्या सोशल मिडीयावर सुशीलकुमार पावरा यांच्या गाण्याने धमाल केली आहे. गाणे सुपरहीट झाल्याचे प्रेषक बोलत आहेत. 
             ही  मराठी गाण्यांची  मराठमोळी ही  स्पर्धा असून फक्त मराठी भाषेतीलच गाणे गायण्याची अटी व शर्ती  आहेत.  सुशीलकुमार पावरा यांनी या स्पर्धेत  "स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार " हे देशभक्ती गाणे कुठल्याही संगीत, वाद्याचा वापर न करता गायले होते. परिक्षकांना सुशीलकुमार पावरा यांचे गाणे आवडले म्हणून  सूर महाराष्ट्राचा गीत गायन स्पर्धेतही सुशीलकुमार पावरा यांचे मेगा ऑडीशन  राऊंड मध्ये निवड केली होती . स्पर्धा आयोजकांनी सुशीलकुमार पावरा यांचे अभिनंदन केले होते. आदिवासी बांधवांनी व अनेक मित्रांनी सुशीलकुमार पावरा यांचे अभिनंदन केले होते व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या .  तसे निवडीचे प्रमाणपत्र डाॅ.धनश्री हरदास व निखील मुळे यांनी  सुशीलकुमार पावरा यांना पाठवले होते  स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश दिला होता. 
         उपांत्य फेरीत सुशीलकुमार पावरा यांनी "गारवा" हे मराठी भावगीत लाईव्ह गायन  करून पाठवले होते. ते गाणे यूटूबवर काल लोड करण्यात आले व लगेच प्रेक्षकांत सुपरहीट झाले.या उपांत्य फेरीनंतर अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेचा निकाल 25 एप्रिल 2021 रोजी  लागणार आहे. 15000/ रूपये रोख रक्कम व डिजीटल प्रमाणपत्र असे या स्पर्धेचे बक्षीस आहे. ही स्पर्धा एकूण तीन गटात असून पावरा यांचा दुस-या गटात समावेश आहे. सुशीलकुमार पावरा यांना ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे.कारण तशी पसंती त्यांच्या गाण्याला मिळत आहे. आपल्याला लाईक करणा-या व विडीओ पाहणा-या सर्व  प्रेक्षक मिञांचे सुशीलकुमार पावरा यांनी जाहीर आभार मानले आहेत.25 तारखेपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने