Breaking News अखेर निर्णय घ्यावा लागलाच... धुळे जिल्यात पुन्हा लॉक डाऊन, जिल्यात 4 दिवसांचा जनता कर्फ्यु




धुळे प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यात कोरोना ची दुसरी लाट आली असुन धुळे जिल्यात कोरोना ची आकडेवारी चिंतेचा विषय आहे.
मागील आठवड्यात जिल्यात कोरोना ने आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली असून एका आठवड्यात संख्या 1000 वर पोचली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात याचा मोठा प्रसार होत आहे. आणि म्हणून
साथरोग प्रतिबंधक कायदा  च्या अन्वये अंमलबजावणीच्या अधिसूचना नियमित करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे त्याअन्वये खबरदारीच्या दृष्टीकोनातून उपाय योजना करत दिलीप जगदाळे , जिल्हादंडधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण धुळे यांनी जिल्यात कोरोना चा वाढतापादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची साकळी  खंडित करण्यासाठी दि 14/03/2021 वार रविवार सायंकाळी 6 वाजेपासून ते 17/03/2021 वार बुधवार सकाळी 06 वाजेपर्यंत कळकळीत जनता कर्फ्यु लागू केला आहे .तरी सर्व नागरिकांनी घरी राहून स्वतःची , स्वतःच्या परिवाराची व सर्व नागरिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे .
जनता  कर्फ्यु दरम्यान धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात व संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात हा आदेश लागू असेल सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची देखील आदेश करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे धुळे जिल्ह्यातील कोरोना ची साखळी खंडित करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने