शिरपूर : माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाने शिरपूर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी, रस्ते दुरुस्ती साठी महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पात एकूण १५ कोटी २५ लाख रुपयांचा भरघोस आर्थिक निधी मंजूर झाला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विकासकामांची घोडदौड सातत्याने सुरु आहे. लवकरच या कामांना सुरुवात होईल.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर झालेली कामे, ५०५४ मार्ग व पूल (०४) जिल्हा व इतर मार्ग अंतर्गत मंजूर कामे पुढीलप्रमाणे.
बोराडी, वाघाडी जातोडे, बाळदे, गिधाडे रस्ता प्रजिमा- २ कि. मी. १८/०० ते २४/०० मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे ता. शिरपूर जिल्हा धुळे (भाग- वाघाडी ते जातोडे) या कामासाठी २ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
शिरपूर, आढे, थाळनेर, होळनांथे, बभळाज रस्ता प्रजिमा- १२ कि. मी. २/९०० ते ४/२००, ५/२०० ते ५/५००, १२/०० ते १३/८०० व १४/३०० ते १६/५५० मजबुतीकरणासह नूतनीकरण करणे ता. शिरपूर जिल्हा धुळे (भाग- रा. म. ३ ते आढे, थाळनेर ते मांजरोद) या कामासाठी १ कोटी ५० लक्ष रुपये.
शिरपूर, आढे, थाळनेर, होळनांथे, बभळाज रस्ता प्रजिमा- १२ कि. मी. २९/०० ते ३६/७०० मध्ये मजबुतीकरणासह नूतनीकरण करणे ता. शिरपूर जिल्हा धुळे (भाग- होळनांथे मांजरोद) या कामासाठी २ कोटी रुपये.
सुळे, रोहिणी, भोईटी रस्ता प्रजिमा-८ कि. मी. २/०० ते ६/६०० मध्ये सुधारणा करणे (भाग- कनगाई ते लाकड्या हनुमान) ता. शिरपूर जिल्हा धुळे या कामासाठी १ कोटी ५० लक्ष रुपये.
बोराडी, वाडी, वाघाडी, जातोडे, बाळदे, गिधाडे रस्ता प्रजिमा- २ कि. मी. ७/०० ते ७/९०० व ९/३०० ते १०/५०० मध्ये सुधारणा करणे ता. शिरपूर जिल्हा धुळे (भाग- नांदरडे गावाजवळ व वाडी ते कुवे फाटा) या कामासाठी १ कोटी रुपये मंजूर.
५०५४ मार्ग व पूल (०३) राज्य मार्ग अंतर्गत पुढीलप्रमाणे कामे मंजूर.
तळोदा, प्रकाशा, शहादा, शिरपूर रस्ता रा. मा. ४ किलोमीटर ८६/५३० ते ८९/५३० मध्ये सुधारणा करणे (भाग - शिरपूर शहर बायपास लांबी, रिक्रिएशन गार्डन पर्यंत १४.०० मी. रुंदीस) ता. शिरपूर जिल्हा धुळे या कामासाठी १ कोटी ५० लक्ष रुपये.
तळोदा, प्रकाशा, शहादा, शिरपूर रस्ता रा. मा. ४ किलोमीटर ६६/८०० ते ६७/३०० तऱ्हाडी गावातील लांबी व कि. मी. ८६/५३० ते ९०/०० शिरपूर शहर बायपास लांबी मध्ये आवश्यक त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट गटारीचे बांधकाम करणे (भाग - तऱ्हाडी गावातील व शिरपूर शहर बायपास लांबी) ता. शिरपूर जिल्हा धुळे या कामासाठी २ कोटी रुपये.
शहादा, सांगवी, हातेड रस्ता रा. मा. १ कि. मी. ९७/०० ते १००/०० मध्ये सुधारणा करणे ता. शिरपूर जिल्हा धुळे (भाग - बोराडी ते सांगवी) या कामासाठी १ कोटी २५ लक्ष रुपये.
शहादा, सांगवी, हातेड रस्ता रा. मा. १ कि. मी. १०४/३३० ते ११०/००, ११२/०० ते ११३/७४० व ११८/०० ते १२१/०० मध्ये सुधारणा करणे ता. शिरपूर जिल्हा धुळे (भाग - जोयदा ते खंबाळे, खामखेडा ते सत्रासेन फाटा) या कामासाठी २ कोटी रुपये.
अशा या सर्व कामांसाठी म्हणजेच शिरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी एकूण १५ कोटी २५ लाख रुपयांचा भरघोस आर्थिक निधी माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने मंजूर झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Tags
news

