प्रतिनिधी कृष्णा कोळी
9823983435
नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये कार्यरत असलेले प्राध्यापक प्रा. डॉ. इद्रीस गोहरखान पठाण यांनी त्यांच्याच महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनीची छेडछाड करून विनयभंग केल्याप्रकरणी सदर विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार करून गुन्हा दाखल केला आहे,तरी अशा प्रकारची घटना म्हणजे शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व विद्यार्थी या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना आहे असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मत आहे.
तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शहादा यांनी मा. तहसीलदार साहेबांना दिले. यावेळी जिल्हा विद्यार्थिनी प्रमुख तेजसा सावळे, प्रीती काकुलदे,अक्षय तिरमले,चंद्रकांत पाटील,प्रितम निकम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
news
