जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिवसानिमित्त कष्टकरी महिला सन्मान सोहळा व साडीभेट उपक्रम..

 



जाधववाडी, लोणखेडा ता.शहादा जिल्हा नंदूरबार...

-सद्गुरू सेवा प्रतिष्ठान,पुणे,युवकमित्र परिवार नंदूरबार व झुंजार फाउंडेशन,कमरावद ता.शहादा जि.नंदूरबार यांच्यातर्फ आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात ऊसतोड कामगार महिलांना साडी भेट देऊन सन्मान करण्यात आला.प्रसंगी युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन,झुंजार फौंडेशनचे संस्थापक कृष्णा कोळी,पत्रकार विजय पाटील,विजय निकम,कैलास सोनवणे , सामाजिक कार्यकर्ते शांताराम शिरसाठ, जितेंद्र पाटील, जितेंद्र जैन, महिरे सर व युवक कार्यकर्ते, कष्टकरी महिला उपस्थित होत्या.साड्या उपलब्ध करून देणेकामी पुणे येथील सद्गुरू सेवा फौंडेशनचे इंजि.सचिन म्हसे यांचे सहकार्य लाभले.

-युवकमित्र परिवार नंदूरबार/पुणे
-झुंजार फौंडेशन, कमरावद ता.शहादा
-सद्गुरु सेवा प्रतिष्ठान,वारजे,पुणे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने