आदिशक्तीच रूप घेऊन
अवघा स्त्रीपणाचा जागर तू,
आसुरांचा विनाश करणारी
आदिशक्तीच तू
मर्यादा उंबराच्या ओलांडून
सर्वच क्षेत्रात अग्रेसर तू,
आकाश झाले ठेंगणे तुझ्यापुढे
आंतराळविरांगणी तू
विभिन्न देश, संस्कृती अनेक
तरी सर्वत्र वात्सल्याचं एक रूप तू,
आई तू, बहिण तू आणि बायको हि तू
पण घराण्याचा वारस नाही तू
शिवाजी राजांची जिजाऊ तू,
ज्योतीबांची सावित्रीबाई तू
रणरागिणी राणी लक्ष्मीबाई तू,
जिच्या शिवाय इतिहास राहील अपूर्ण अशी अद्भुत शक्ती तू.
किती कष्ट किती यातना
तरी ताठ उभी आहेस तू
गौरव अभिमान तुझा
किती कर्तुत्ववान तू.
प्रा. सौ. माधुरी पाटील
द. मा. बारी कनिष्ठ महाविद्यालय, धुळे
