धुळे तालुक्यातील मुकटी येते सलग तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस झाला,त्यात ज्वारी,मका,बाजरी,दादर,या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी शिवसेना शाखेने तलाठी व कृषी सहाय्यक यांना पंचनामा करण्याचे आदेश दिलेत.त्यांच्या माहितीनुसार अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन कृषी सहाय्यक डी.व्ही.सूर्यवंशी. तलाठी जितेंद्र बांगर,यांनी २५ शेतकऱ्यांचा पंचनामा केला,यावेळी शिवसेना शाखाप्रमुख प्रवीण साळुंके,शेतकरी विनायक पाटील,बबलू साळुंके, सोनू साळुंके. वसंत साळुंके,अमृत पवार,भूषन वानखेडे, योगेश सत्त्वविस,मुकेश वाणी,कल्पेश पाटील,निंबा साळुंके,उपस्थित होते.
Tags
news
