आगामी काळातील सण उत्सव प्रशासनाच्या नियमांच्या अधीन राहूनच साजरे करावेत शिरपूर पोलिस प्रशासनाचे आवाहन




शिरपूर प्रतिनिधी - माननीय जिल्हाधिकारी सो धुळे यांच्या आदेशान्वये धुळे जिल्ह्यात दिनांक 27 मार्च ते 30 मार्च या कालावधीमध्ये जनता कर्फ्यू लोक डॉन चे आदेश करण्यात आले आहेत .त्यामुळे शिरपूर शहरात पुढिल आठवड्यात साजरे होणारे हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे होळी, रंगपंचमी शबे बारात या सारखे सण आणि उत्सव हे प्रशासनाचे नियम कायदे व लागू असलेले निर्बंध यांचे तंतोतंत पालन करूनच साजरे करण्यात यावे कोणीही गर्दी न करता व सार्वजनिक रीत्या उत्सव साजरा न करता फक्त पारंपारिक पद्धतीने पूजाअर्चा करून आपले सण आणि उत्सव साजरे करावेत असे आवाहन शिरपूर पोलीस प्रशासनातर्फे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी केले आहे.
 यासाठी आज दिनांक 27 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता शिरपूर शहर पोलीस ठाण्यात एक छोटेखानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीसाठी शहरातील विविध धर्मातील प्रतिष्ठित नागरिक राजकीय पक्षांचे पदाधिकारी नगरसेवक पत्रकार इत्यादी उपस्थित होते.
प्रशासन सर्वधर्मीय लोकांच्या धर्माच्या व त्यांच्या भावनांचा आदर करते मात्र सध्या कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारामुळे धुळे जिल्ह्यात व शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत असल्याने व दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असल्याने परिस्थितीचे गांभीर्य पाहता आपल्या आपल्या परिवाराच्या व सार्वजनिक आरोग्याच्या हीताचा विचार करून सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे कायद्यांचे पालन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
 मात्र जर कोणी नियमांचे उल्लंघन करून साथरोग प्रतिबंध कायद्यांचे उल्लंघन करेल अशांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा देखील इशारा यावेळी देण्यात आला आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने